Mobile Boon Or Curse Essay In Marathi | ‘मोबाईल शाप की वरदान’ निबंध मराठी

‘मोबाईल शाप की वरदान’ निबंध मराठी

Mobile Boon Or Curse Essay In Marathi

Mobile Boon Or Curse Essay In Marathi In 10 Lines

‘मोबाईल शाप की वरदान’ निबंध मराठी १० ओळी

क्रमांक‘मोबाईल शाप की वरदान’ निबंध मराठी
1.या वेगाने वाढणाऱ्या जगात आपण मानव पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत.
2.आजकालच्या या जगात, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला मोबाईल फोन, जो आपल्या आयुष्याचा एक भागच बनला आहे.
3.ती प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. ते लहान असल्यामुळे कुठे हि घेऊन जाऊ शकता.
4.मोबाइलला चे फायदे आणि तोटे हे दोन्ही आहेत.
5.मोबाइलमुळे मुलं मैदानी खेळ विसरत आहेत. आज काळ ते फक्त मोबाइलला वर गेम खेळातात.
6.जर तुम्हाला कोणाला काही पैसे पाठवायचे आहेत तर मोबाइल वरून आपण करू शकतो, किंवा आपण खाणे पिणे सुद्धा मागवू शकतो.
7.आपण ऑनलाईन सर्व गोष्टी मागवू शकतो पण त्यामुळे आपण जास्त आळशी होत चाललो आहे.
8.येत्या काही दिवसात लठ्ठ पण अजून एवढलेला दिसून येत आहे कारण आपली हालचाल कमी झाली आहे.
9.जिथे गरज आहे तिथेच मोबाइल चा वापर करावा. आवश्यक तेवढाच.
10.त्याने आपली नेहमीची हालचाल चालू राहील आणि बाकीच्या लोकांशी सुद्धा आपला बोलणं चालू राहील नाहीतर आपण नेहमी फोन मध्ये असलो कि बाजूला कोण आहे याचा भानसुद्धा राहत नाही.

Mobile Boon Or Curse Essay In Marathi In 150 Lines

‘मोबाईल शाप की वरदान’ निबंध मराठी १५० ओळी

मोबाइल फोन आपल्यासाठी आजकाल खूप महत्वाचा भाग बनला आहे. आपण कुठेही गेलो तरी, मोबाइल आपल्या सोबत नेहमी असतो. मोबाइल फोनच्या मदतीने आपण जगभरातल्या लोकांशी संपर्क किंवा संवाद साधू शकतो, पैसे पाठवू शकतो, खाणे-पिणे ऑनलाईन मागवू शकतो. तसेच कपडे आणि इतर अनेक गोष्टी ऑनलाईन मागवू शकतो. पण मोबाइलचे फायदे जितके आहेत, तितकेच तोटेही आहेत.

मोबाइलमुळे मुलं मैदानी खेळ हळू हळू विसरत आहेत. ते फक्त मोबाइलवर गेम खेळण्यात वेळ घालवतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि हालचाल कमी झाल्यामुळे वजन सुद्धा वाढत आहे. याशिवाय, सगळ्यात नकारत्मक बाब म्हणजे आपण जास्त आळशी होत आहोत, कारण आपल्याला सर्वकाही मोबाइलवर उपलब्ध आहे.

म्हणून, आपण मोबाइलचा वापर फक्त आवश्यक असेल तेवढाच करावा. गरज नसताना मोबाइलचा वापर टाळावा, जेणेकरून आपल्या शारीरिक हालचाली सुरू राहतील आणि आपण आपल्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी प्रत्यक्षात संवाद साधू शकू. मोबाइल आपल्यासाठी सोयीचा आहे, पण त्याचा जास्त वापर आपल्याला आळशी बनवू शकतो. म्हणून, मोबाइलचा वापर योग्य प्रमाणात करणे खूप आवश्यक आहे.

Mobile boon or curse essay in marathi 150 words pdf

Mobile boon or curse essay in marathi 200 words

‘मोबाईल शाप की वरदान’ निबंध मराठी २०० ओळी

यामध्ये काहीही शंका नाही की मोबाइल मुळे बराच आमूलाग्र बदल घडून आलेला. लोकं आधी एकमेकांशी सवांद साधण्यासाठी पत्र व्यवहार करत. टेलिफोन चा सुद्धा बराच वापर केला जात असे. पण आता लोकं एकमेकांशी बोलण्यात कमी आणि इतर मनोरंजनासाठी फोने वापरतात आणि त्यांचा महत्वाचा वेळ वाया घालवतात. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे ‘ईंटरनेट’ चा गरजेपेक्षा जास्त वापर. आधी इंटरनेट आले तेव्हा त्याचा आपण मर्यादित वापर करत असू कारण आपल्याला ईंटरनेट सुविधांचा लाभ घेण्यासाठी रिचार्ज करावा लागत असे. आता सर्वीकडे wifi उपलब्ध असल्यामुळे इंटरनेटचा अति वापर होतो.

संशोधनामध्ये असे आढळून आले आहे कि किमान आपण दिवसातून ४ तास हे आपल्या मोबाइल फोने वर विनाकारण घालवत असतो. मोबाइल मुळे मैदानी खेळ खेळणारे लोक सुद्धा कमी झाले आहेत. कारण मुलं आपल्या रूम मध्ये बसून युट्युब, रील्स आणि इंस्टग्राम सारखे सोशल ऐप वरती मनोरंजन करतात. लोकांशी संवाद साधने कमी झाले आहेच त्यामुळे प्रत्यक्षात गाठीभेटी सुद्धा कमी आल्या आहेत. युरोपिअन देशांमध्ये असे आढळून आले आहे कि मोबाईल च्या जास्त वापराने ताण तणाव सुद्धा वाढत आहेत. झोपण्याची वेळ सुद्धा आपण मोबाईल च्या वापराने चुकवतो. त्यामुळे शरीरावर्ती सुद्धा त्याचा नकर्मक परिणाम होतो. आपलं मन हे कायम अशांत राहते फोन च्या अति वापराने आणि मानसिक विकार होणे सहज शक्य होते. आपण आपल्या सवयीं वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

Mobile boon or curse essay in marathi 200 words pdf

Mobile boon or curse essay in marathi in 300 words

‘मोबाईल शाप की वरदान’ निबंध मराठी ३०० ओळी

मोबाइल फोन: हा आपल्यासाठी श्राप आहे कि वरदान आहे ते पाहूया:

आजच्या डिजिटल युगामध्ये , मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. हा फोने आपल्याला अनेक सुविधा देऊ शकते, परंतु त्याचसोबत त्याचे काही नुकसानही आहे. चला तर मग, मोबाईल फोनच्या फायदे आणि नुकसानीवर एक नजर टाकूया.

मोबाइल फोनचे काय काय लाभ आहेत ते पाहूया:

मोबाइल फोनने आपले जीवन सोपे केले आहे. GPS चा उपयोग करून आपण कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान शोधू शकतो किंवा आपला फोन हरवल्यावरही आपण ते शोधू शकतो. गावात बसून आपण दुसऱ्या देशात असलेल्या आपल्या कुटुंबियांना निरोप देऊ शकतो. ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ द्वारे घरबसल्या विविध अभ्यासक्रम शिकवू शकतो. ऑनलाईन बँकेद्वारे आपण एकमेकांना पैसेही पाठवू शकतो. आपल्या आयुष्यातील काही खास क्षणांची आठवण म्हणून फोटो काढून, इतरांना पाठवू शकतो. ज्याणेंकरून तेही आपल्या आनंदात सहभागी होतील. रेल्वे आणि परीक्षेची वेळापत्रकाची माहिती ऑनलाईन मिळवता येते. घरबसल्या आपण कपडे, घड्याळ, बूट, जेवण किंवा किराणामाल सुद्धा!

आता आपण मोबाइल फोनचे तोटे काय आहेत ते बघूया:

मोबाइल फोनच्या वापरामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तासंतास मोबाइल वापरल्याने आपली शारीरिक हालचाल कमी होते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि मानसिक सर्जनशीलता कमी होते. आपल्याभोवती कोण काय करत आहे याचे ही आपल्याला भान राहत नाही आणि मोबाइलच्या घातक रेडिएशनमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मोबाइलच्या सततच्या वापरामुळे आपल्या जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि प्रत्येकाला मनाची शांती हवी असते, पण ती हळू हळू कमी होते. कान आणि मेंदूवर फोन जास्त वापरल्याने नकारात्मक परिणाम होतो, तसेच मोबाइलच्या व्यसनामुळे वेळेचे भान राहत नाही आणि डोळ्यांची स्थिती खराब होते.

मोबाइल फोन चा योग्य वापर कसा करावा?

मोबाइल फोनच्या अत्यधिक वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ज्या ऍपवर जास्त वेळ घालवतो, ते ऍप फोनवरून हटवणे आवश्यक आहे. काम करत असताना फोनचा विनाकारण वापर टाळा आणि मनोरंजनासाठी मैदानी खेळ, मित्र-मैत्रिणींशी वेळ घालवणे, पुस्तकं वाचन किंवा कुटुंबासोबत फिरणे यासारख्या क्रियाकल्पांचा वापर करू शकतो. एक निश्चित वेळ ठरवून त्या वेळेतच फोन वापरून वेळ वाचवणे. आपण वैयक्तिक बोलणे आणि फोनवर बोलण्यातील फरक समजून घ्यायला हवा.थोडक्यात, मोबाइल फोनचा मर्यादित वापर करून आपले जीवन सकारात्मकतेने बदलवू शकतो.

Mobile boon or curse essay in marathi in 300 words pdf

Mobile boon or curse essay in marathi 500

मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी 500 शब्द

मोबाईल फोन आपल्याला सतत आपल्या कामापासून आपल्याला विचलित करत असते. कंटाळा येणे हे मुख्य कारण झाले आहे. आपण स्वतःला सोशल मीडिया मार्फत नवीन घडामोडी, व्हिडिओस, रिल्स सतत पाहत असतो आणि आपले मन कमी प्रतीच्या कामात व्यस्त करून वेळ वाया घालवतो. फोने चे फायदे आहेत हे आपण मान्य करतोच पण त्याबरोबर नुकसान हि आहे हे हळू हळू सर्वाना समजायला लागले आहे. आता मोबाईल हे वरदान आहे का श्राप आहे हे आपल्या मोबाईल वापरण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे.

मोबाइल चे फायदे –

मोबाइल फोन चे फायदे तर भरपूर आहेत जसे कि GPS मुळे एखाद्याची अचूक स्थान शोधून काढू शकतो. खेडेगावात किंवा दुसऱ्या देशात असलेल्या आपल्या कुटुंबाला संदेश देऊ शकतो. ‘डिजिटल लर्निंग’ माध्यमातून आपण घर बसल्या नवी नवीन अभ्यासक्रम शिकू शकतो. कोणाला पैसे पाठवायचे असतील तेही बँकेत न जाता आपण पाठवू शकतो. एखाद्या खास क्षणाची आठवण म्हणून आपण फोटो काढू शकतो आणि इतरांना पाठवू शकतो. रेल्वेचे वेळापत्रक किंवा विद्यालयाचे वेळापत्रक, निकाल आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो. घरबसल्या आपण बरेच काही खरेदी करू शकतो अगदी हेलिकॉप्टर सुद्धा !

कधी कधी आपण जेव्हा सुट्टीत गावी असतो तेव्हा वीज गेल्यानंतर किंवा शेतात जाताना अजून ही मोबाईल चा फ्लॅश लाईट म्हणून वापर करतो. जुनी किंवा नवीन गाणी आपण फोन मार्फत आपण ऐकतो. फोन नव्हता तेव्हा आपण सर्वे नंबर एका डायरी मध्ये नोंद करून ठेवायचो, आता आपण तेच फोने मध्ये जातं करून ठेवतो. अचूक हिशोबा साठी आपण कॅल-कुलेटर चा वापर करु शकतो.

मोबाईल चे नुकसान –

जितके मोबाईल फोन चे फायदे आहेत तितकेच त्याचे नुकसान सुद्धा आहे. तासन-तास मोबाइल वापरात एकाच जागी बसने, हालचाल कमी झाल्याने लठ्ठपणा वाढणे आणि आपल्यातील सर्जनशीलता कमी होणे. आपण मोबाईल फोने मध्ये इतके व्यस्त होतो कि आपल्या अबाजूला कोण बसले आहे का याचे सुद्धा भान राहत नाही. मोबाइल फोन घातक रेडिएशन सोडते ज्याने करून आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. खाताना, इतरांशी बोलताना, प्रवास करताना आपण सतत मोबाइल वापरात असतो ज्याने आपल्या आयुष्याची गुणवत्ता कमी होते. मनाचे सतत काही काही मोबाईल मार्फत मनोरंजन करत असल्यामुळे मन नेहमी अशांत राहते आणि आपली झोप सुद्धा कमी होते.

सतत फोनवर बोलल्याने कानाचा आणि मेंदूचा ही त्रास होऊ शकतो. जसे मद्यपान, धूम्रपान सारख्या मादक गोष्टींचे व्यसन लागते तसेच फोन वापराचे सुद्धा व्यसन लागते. काही लोक इतके मग्न होतात कि वेळेचे भान सुद्धा राहत नाही. विद्यार्थ्यांमध्ये एका जागी बसून अभ्यास करण्याची क्षमता सुद्धा कमी झालेली दिसते. जास्त वेळ मोबाइल स्क्रिन वापरामुळे डोळे पण लवकर कमजोर होतात. मानसिक शांतता आपली एकंदरीत हलते. कारण आपण मानसिक आनंदा साठी मोबाइल फोन वर जास्त निर्भर असतो.

थोडक्यात उपाय –

सर्वात आधी ज्या ऍप वर आपण जास्त वेळ वाया घालवतो ते ऍप फोन मधून घालवणे. थोडी शिस्त लावणे गरजेचे आहे. जसे कि काम करत असताना फोन न घेणे. फोन वापरासाठी योग्य ती वेळ ठरवणे. मनोरंजनासाठी मैदानी खेळ खळणे, मित्र-मैत्रिणींसीबत वेळ घालवणे, पुस्तकं वाचणे किंवा कुटुंबासोबत फिरायला जाणे अशा गोष्टी करू शकतो. हे लगेच आचरणात आणणे शक्य नाही पण कालांतराने आपण फोन वापरावर नियंत्रण करू शकतो.

एक निश्चित वेळ ठरवणे जसे कि १ तासच फोन वापरणे. फोन वर बोलणे आणि वैयक्तिक बोलणे यातला फरक समजून घेणे. आपले आयुष्य नक्की सकारात्मकतेणे बदलेल जेंव्हा आपण फोन चा मर्यादित वापर करायला शिकू.

Mobile boon or curse essay in marathi 500 pdf

FAQ – Mobile Boon Or Curse Essay In Marathi

मोबाइल फोनचा वापर कसा करावा?

मोबाइल फोनचा योग्य वापर म्हणजे आवश्यकतेनुसार आणि मर्यादित वेळेत वापर करणे. जास्त वेळ फोनवर घालवणे टाळा आणि आवश्यक असलेले ऍप्सच वापरा.

मोबाइल फोनचे फायदे कोणते आहेत?

मोबाइल फोनमुळे आपण GPS चा वापर करून अचूक स्थान शोधू शकतो, कुटुंबासोबत संपर्क साधू शकतो, डिजिटल लर्निंगद्वारे नवीन गोष्टी शिकू शकतो आणि पैसे बँकेत न जाता पाठवू शकतो.

मोबाइल फोनचे नुकसान कोणते आहेत?

मोबाइल फोनमुळे लठ्ठपणा, सर्जनशीलता कमी होणे, मानसिक अशांती आणि झोपेची समस्या उद्भवू शकतात. तसेच, सततच्या वापरामुळे डोळ्यांचे आरोग्य आणि मेंदूवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

मोबाइल फोनच्या व्यसनापासून कसा बचाव करावा?

मोबाइलवरील जास्त वेळ घेतलेल्या ऍप्स हटवणे, कामाच्या वेळी फोन न घेणे आणि फोन वापरण्यासाठी एक ठराविक वेळ निश्चित करणे हे उपाय आहेत.

मोबाइल फोनमुळे सर्जनशीलता कमी होते का?

होय, तासन-तास मोबाइल वापरामुळे मेंदूच्या सर्जनशीलतेवर वाईट परिणाम होतो, कारण तो सतत एका प्रकारच्या मनोरंजनात अडकतो.

मोबाइल फोनच्या रेडिएशनमुळे आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

मोबाइल फोनमधून निघणारे रेडिएशन आरोग्याला धोका पोहोचवते, विशेषत: मेंदू आणि कानावर वाईट परिणाम करू शकते.

मोबाइल फोनचा सकारात्मक वापर कसा करता येईल?

फोनचा सकारात्मक वापर म्हणजे आवश्यक कामांसाठी त्याचा वापर करणे, मैदानी खेळ खेळणे, मित्र-मैत्रिणींना भेटणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top