Table of Contents
Bhagat Singh Essay In Marathi 10 lines मराठी निबंध
भगतसिंग मराठी निबंध १० ओळी मध्ये
क्रमांक | Bhagat Singh Essay In Marathi 10 lines |
---|---|
1. | शहीद भगतसिंग या नावाने ओळखले जाणारे भगतसिंग हे २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबमध्ये जन्मलेले असे महान क्रांतिकारक होते. |
2. | २३ व्या वर्षी स्वातंत्र्य लढ्यात लवकर सामील झाले आणि पुढे ते हुतात्मा झाले. |
3. | स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातून आलेले, त्यांचे वडील आणि काका हे गांधींचे अनुयायी होते, ज्यांचा भगतसिंग वर खोलवर प्रभाव पडला. |
4. | भगतसिंग यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी १३ व्या वर्षीच शाळा सोडली, तिथे त्यांनी युरोपियन क्रांतिकारक चळवळींचा अभ्यास केला. |
5. | त्यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी नौजवान भारत सभेची स्थापना केली. पुढे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सामील झाले, सुखदेव आणि राजगुरू यांसारख्या क्रांतिकारकांना भेटले. |
6. | त्यांनी कीर्ती किसान पक्षासाठी अनेक लेख लिहिले पण त्यांनी लग्न सरळ करण्यास नकार दिला आणि स्वतःला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात समर्पित केले. |
7. | १९२८ मध्ये, ब्रिटीश सरकारच्या सायमन कमिशनने, ज्याने भारतीय सदस्यांना वगळले होते, त्याला विरोध झाला. |
8. | अशाच एका निषेधात लाला लजपत राय जखमी झाले आणि नंतर मरण पावले. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी भगत सिंह यांनी ब्रिटीश अधिकारी जॉन पी. साँडर्सची हत्या केली आणि नंतर दिल्लीतील केंद्रीय विधानसभेवर पण बॉम्बस्फोट केला. त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला, त्यांनी तुरुंगात सुद्धा उपोषण केले. |
9. | २३ मार्च १९३१ रोजी राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. |
10. | भगतसिंग यांना खरा देशभक्त म्हणून आजही स्मरण केले जाते ज्यांच्या बलिदानाने राष्ट्राला बरीच प्रेरणा दिली, त्यांना शहीद भगतसिंग ही पदवी मिळाली. |
Bhagat Singh Essay In Marathi in 100 lines
भगत सिंग हा भारतातील शाहिद भागात सिंग या नावाने ओळखले जातात. कारण त्यांनी कमी वयातच भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता आणि प्राणांची आहुती दिली. त्यांच्या जन्म एका सिख कुटुंबामध्ये ‘बंगा’ या गावात सॅन १९०७ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती आणि बाबांचे नाव किसान सिंग होते. त्यांच्या कुटुंबातले काही जण हे महाराजा रणजित सिंग सैन्यच्या तुकडीत होते. भगत सिंग हे आजाद भारत या ‘स्वदेशी’ दल मध्ये होते. त्यांचे मत होते कि जर भारतातला पूर्णपणे ब्रिटिशांच्या सरकार मधून आजाद करायचा असेल तर प्राण जाईपर्यंत लढा देणे अवध्यक आहे. म्हणून त्यांनी खूप कमी वयात देशासाठी प्राण दिले. अगदी कशाची विचार न करता.
Bhagat Singh Essay In Marathi In 200 lines
भगत सिंग हे भारतात एक सकारात्मक बदल आणणाऱ्या पैकी एक होते. भगत सिंग चे आजोबा यांनी ब्रिटिश आर्मी जोईनेड करण्यास नकार दिला होता आणि त्यांनी खालसा विद्यालयात भरती झाले. कारण त्यांनी ब्रिटिशांचे समर्थन नाकारले होते. भगत सिंग याना त्या कालच्या आर्य समाजाकडून जास्त प्रेरणा मिळत असे. भगत सिंग हे त्यांच्या दोन गोष्टींमुळे जास्त प्रसिद्ध झाले होते. एक म्हणजे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेले आंदोलन आणि त्यांना झालेली शिक्षा.
भगत सिंग यांचा मृत्यू कसा झाला ?
ब्रिटिश सरकारने सण १९२८ साली एक समिती नेमली होती त्या समितीचे नाव होते ‘Simon’. या समिती चे हे काम होते कि भारतातील अशा गोष्टींकडे लक्ष ठेवायचे जे ब्रिटीश सरकारच्या विरोधात असतात. लाला लाजपत राय हे सुद्धा या समितीच्या विरोधात होते. म्हणून यांनी काही भारतीयांबरोबर लाहोर स्टेशन ला आंदोलन केले. याचा उत्तर म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर लाठी चार्ज केला. या घटनेमध्ये लाला लाजपत राय हे बरेच जखमी झाले आणि काही दिवसांनी त्यांनी हॉस्पिटलमध्ये प्राण सोडले. याचा बदला घेण्यासाठी भगत त्यांनी ब्रिटिश अधिकारी जॉन सँडर्स याना ठार केले आणि त्यांनी आपल्या काही साथी दारांसह दिल्ली ला त्यांच्या विधानसभेत बॉम्ब स्फोट केले. नंतर ते ब्रिटिश पोलिसाच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी केलेले कृत्य काबुल केले. याची शिक्षा म्हणून त्यांना आणि त्यांचे सहकर्मी राजगुरू आणि सुखदेव याना सण मार्च २३, १९३१ ला फाशी देण्यात आली.
Bhagat Singh Essay In Marathi In 400 lines
भगत सिंग हे शाहिद भगत सिंग म्हणून ओळखले जातात. ते त्यांच्या ब्रिटिश सरकार विरुद्ध केलेल्या संघर्षा मुळे ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपले आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. भगत सिंग हे नुकतेच १२ वर्षाचे होते जेव्हा, जालियन बाग हत्याकांड म्हणून ओळखला जाणारा आणि ब्रिटिशांनी भारतीयांविरुद्ध केलेला एक कट त्यांनी अनुभवला होता. बरेच भारतीयांची त्यावेळी हत्या ब्रिटिश सरकारकडून करण्यात अली होती. जस जसे ते मोठे होत गेले त्यांचा ब्रिटिश सरकारबद्दल तिरस्कार अजून वाढत गेला. लाला लाजपत राय यांच्यावर झालेल्या अन्याविरुद्ध बदल म्हणून त्यांनी ब्रिटिश अधिकारी याना ठार केले होते आणि त्यांनी त्यांच्या सहकार्या सोबत ब्रिटिश विधानसभेत बॉम्ब स्फोट केले.
भगत सिंग यांचे बालपण:
भगत सिंग यांच कुटुंब सुद्धा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात शामिल होते. त्यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे दोघेही आदींपासून ब्रिटिश सरकारच्या विरोधात होते. ते वेळो वेळी सर्व भारतीयांना एकत्र अनंत आणि लढा देण्यास प्रेरणा देत. त्यांच्या वडिलांसह भगत सिंग च्या सुद्धा रक्तात एक स्वातंत्र्य सेनांनी बनणं होते. त्यांच्या कुटुंबाच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी लढे दिले.
भगत सिंग यांचे शिक्षण:
जेव्हा महात्मा गांधी यांनी इंग्रज शिक्षण पद्धतीचा विरोध केला तेव्हा भगत सिंग च्या वडिलांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे भगत सिंग चे शिक्षण पण फक्त १३ वरचे असता ना सोडावे लागले. मग त्यांनी नॅशनल विद्यालय लाहोर येथे शिक्षण पूर्ण केले.
भगत सिंग यांनी भारतासाठी केलेलं संघर्ष:
भगत सिंग तेव्हा इंग्रीज मध्ये येणारे वृत्त पत्र वाचत असत. त्यामुळे भारतात काय चालला आहे याची खबर त्यांना असे. भारत चळवळी ला पाठिंबा म्हणून त्यांनी एका समिती चे निर्माण केले आणि त्याचे नाव नवजवान भारत सभा म्हणून दिले. नंतर ते ‘भारत रिपब्लिक असोसिएशन’ चे नेते झाले. त्यांना पुढे चंद्रशेखर आजाद, राजगुरू आणि सुखदेव यांनी साथ दिली. भगत सिंग यांनी कीर्ती किसान पार्टी या साठी लेखन सुद्धा लिहिले. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना लग्न करण्यास सल्लाही दिला पण त्यांनी त्यांना साफ नकार देत त्यांना त्यांचे आयुष्य देशसेवे साठी घालवायचे आहेत असे सांगितले.
त्यांचा ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष चालूच होता. पुढे ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केले. काही दिवसांनी ते पुन्हा बाहेर येत आणि लेख लिहीत असे. त्यांनी इतर लोकांना हि संघर्षात एकत्र आणले जे ब्रिटिश सरकारच्या विरोधात होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध केलेले संगर्ष म्हणून त्यांना फाशी ची शिक्षा दिली.
भगत सिंग हे महान स्वातंत्र्य सेनांनी होते. त्यांनी फक्त देशाचा विचार केला. त्यांना कमी वयातच काय चुकीचे काय बरोबर हे काळात होते. आपला देश स्वातंत्र व्हावा म्हणून ब्रिटिश सरकारविरुद्ध संघर्ष केले. त्यांचा त्याग आणि धाडस आजही शाळेत मुलांना शिकवले जाते.
भगतसिंग कोण होते?
भगतसिंग एक भारतीय क्रांतिकारक होते, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण केले.
भगतसिंगांचे जन्म कुठे झाला?
भगतसिंगांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबमधील बंगा गावात झाला होता, जे आज पाकिस्तानमध्ये आहे.
भगतसिंगांची विचारसरणी काय होती?
भगतसिंग समाजवादाच्या विचारसरणीचे समर्थक होते आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीला संपवून स्वातंत्र्य मिळवण्याचा त्यांचा उद्देश होता.
भगतसिंगांनी कोणते प्रमुख कार्य केले?
भगतसिंगांनी १९२९ मध्ये दिल्ली असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकून इंग्रजांच्या विरोधात निषेध केला. त्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा दिला.
भगतसिंगांचा मृत्यू कधी आणि कसा झाला?
भगतसिंगांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. ते फाशीवर जाणारे तरुण क्रांतिकारक होते.
भगतसिंगांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान काय आहे?
भगतसिंगांनी भारतीय तरुणांना स्वातंत्र्यसाठी लढण्याची प्रेरणा दिली. त्यांचे बलिदान भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गती देणारे ठरले.
भगतसिंगांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत?
भगतसिंगांना मरणोत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आदरांजली आणि स्मारके उभारण्यात आली आहेत. त्यांच्या स्मरणार्थ अनेक पुस्तके आणि चित्रपट बनवण्यात आले आहेत.
भगतसिंगांनी कोणते संदेश दिले?
भगतसिंगांचा संदेश होता की समाज बदलण्यासाठी विचारांची ताकद आणि क्रांतिकारक विचारसरणी आवश्यक आहे.
भगतसिंगांनी इन्कलाब जिंदाबाद का म्हटले?
इन्कलाब जिंदाबाद म्हणजे ‘क्रांती जिवंत राहो,’ हा नारा त्यांच्या विचारसरणीचे प्रतीक होता. यामुळे भारतीयांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली.
भगतसिंगांचे जीवनावर आधारित चित्रपट कोणते आहेत?
भगतसिंगांवर आधारित ‘शहीद’, ‘द लेजेंड ऑफ भगतसिंग’, ‘रंग दे बसंती’ यांसारखे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी त्यांचे जीवन आणि त्यांचे बलिदान लोकांसमोर आणले.
- New Mobile Launch 2024 5G नवीन मोबाइल २०२४
- नवीन iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max : 2024 launch price
- The Power Of Your Subconscious Mind | हे तुमच आयुष्य कसा बदलू शकते?
- Mazi Shala Nibandh | माझी शाळा निबंध
- Best 32 rakshabandhan quotes in marathi | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा