Table of Contents
Essay On MS Dhoni In Marathi In 10 Lines
क्रमांक | महेंद्र सिंह धोनी निबंध मराठी |
---|---|
1. | भारतात क्रिकेट हा खूप लोकप्रिय आहे आणि त्यात खेळाडूंचे खूप चाहते आहेत. |
2. | एम एस धोनी हे जगातील सर्वात छान कर्णधारांपैकी एक आणि झारखंडमधील एक साधा सरळ मुलगा होता. |
3. | धोनीचा जन्म हा ७ जुलै १९८१ रोजी झाला आणि त्याच्या कुटुंबाचे रांची (झारखंड) येथे वास्तव्य करत आहेत. |
4. | शालेय जीवनात धोनीने फुटबॉल आणि बॅडमिंटनमध्ये प्रावीण्य मिळवले होते. |
5. | त्याच्या फुटबॉल प्रशिक्षकाने त्याला क्रिकेट खेळण्यासाठी स्थानिक क्रिकेट क्लबमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित केले. तीथे त्याने यष्टी रक्षण कौशल्य शिकले. |
6. | १९९८-९९ मध्ये धोनीची अंडर-१९ बिहार क्रिकेट संघासाठी निवड झाली आणि त्याने पहिल्याच रणजी सामन्यात अर्धशतक झळकावले. |
7. | २००० मध्ये धोनी भारतीय रेल्वेमध्ये एक तिकीट परीक्षक म्हणून रुजू झाले, पण क्रिकेटमध्ये त्यांनी प्रगती चालू ठेवली. |
8. | त्याने पाकिस्तान विरुद्ध १४८ आणि श्रीलंका विरुद्ध १८३ धावांची खेळी करून आपल्या कौशल्याची चमक दाखवली. |
9. | २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. |
10. | धोनीला राजीव गांधी खेल रत्न आणि एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाले आहेत. |
Essay On MS Dhoni In Marathi In 500 Words
महेंद्र सिंह धोनी निबंध मराठी
धोनीच्या जीवनात आणि क्रिकेट कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे क्षण आहेत ज्यामुळे तो एक महान खेळाडू बनला. त्याच्या खेळाची सुरुवात, संघर्ष, यशस्वी होण्याच्या प्रवासाची कथा ही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेले यश त्याच्या आक्रमक शैलीने केलेली खेळाची सुरुवात आणि विशेषतः शांत स्वभावामुळे त्याला जगभरात ओळख मिळाली आहे.
धोनीचा सुरुवातीचा प्रवास –
महेंद्रसिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी रांची झारखंड येथे झाला. त्याचे आई-वडील उत्तराखंडमधील आहेत, पण धोनीचा संपूर्ण प्रवास झारखंडमध्येच घडला. त्याने त्याचे शालेय शिक्षण डीएव्ही जवाहर विद्या मंदिर श्यामली रांची येथे पूर्ण केले. सुरुवातीला त्याला फुटबॉल खेळण्याची आवड होती आणि तो एक उत्कृष्ट गोल-कीपर सुद्धा होता. शालेय क्रिकेट संघात त्याला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोनं केलं. धोनीला त्याचे शिक्षक, बॅनर्जी यांनी विकेटकीपिंग करण्यास सांगितले आणि तेथून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली.
फुटबॉल ते क्रिकेट –
धोनीला सुरुवातीपासूनच फुटबॉलमध्ये करिअर करायचे होते, पण त्याच्या शाळेत असताना त्याला क्रिकेट संघात विकेटकीपर म्हणून खेळण्याची संधी मिळाली. १९९७-९८ मध्ये अंडर-१६ विनू मांकड ट्रॉफीमध्ये धोनीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे त्याची निवड बिहारच्या संघात झाली. त्यानंतर धोनीने बिहारसाठी १९९९ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले.
धोनीच्या कारकिर्दीतील हा काळ खूप संघर्षपूर्ण होता. धोनीने २०००-०१ मध्ये रेल्वेमध्ये स्पोर्ट्स कोटा अंतर्गत नोकरी मिळवली होती. त्याने त्याच्या सुरुवातीच्या दिवसांत रेल्वेत काम करत क्रिकेटसाठी वेळ दिला. मात्र, त्याच्या खेळावर याचा परिणाम होत होता. याच काळात त्याने एक मोठा निर्णय घेतला आणि रेल्वेतील नोकरी सोडून क्रिकेटमध्ये पूर्णवेळ लक्ष देण्याचा निर्णय घेतला.
क्रिकेटमधील संघर्ष आणि यश –
धोनीने क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. २००३-०४ मध्ये, त्याने जबरदस्त कामगिरी केली आणि त्याची निवड भारत ‘अ’ संघासाठी झाली. त्याने झिम्बाब्वे आणि केनिया दौऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करून आपले स्थान पक्के केले. धोनीने त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसह विकेटकीपिंगमध्येही प्रावीण्य मिळवले.
त्याचा खेळाडू म्हणून असलेला आत्मविश्वास आणि शांत स्वभाव यामुळे त्याने मैदानात अनेक चांगले निर्णय घेतले. धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात पाकिस्तानविरुद्ध २००५ साली केलेल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने केलेली खेळातील प्रगती आणि नेतृत्व क्षमता पाहून त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले.
भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व
धोनीने भारतीय संघाचे कर्णधारपद मिळविल्यानंतर २००७ साली भारताला ICC T20 वर्ल्डकप जिंकून दिला. हा विजय भारतीय क्रिकेट इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ साली वनडे वर्ल्डकपही जिंकला. धोनीच्या नेतृत्वशैलीत तो खेळाडूंच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन देणारा आणि शांतपणे मैदानातील निर्णय घेणारा होता. त्याच्या निर्णयक्षमतेमुळे भारताने अनेक मोठे सामने जिंकले.
धोनीचे नेतृत्व कौशल्य –
धोनीचे नेतृत्व कौशल्य फक्त खेळातच नाही तर त्याच्या शांत स्वभावातही दिसून येते. धोनी कधीही दडपणाखाली खेळताना घाबरत नाही, उलट तो परिस्थितीचे योग्य आकलन करून निर्णय घेतो. त्याचे ‘कॅप्टन कूल’ असे बिरुद त्याच्या शांत स्वभावामुळे मिळाले आहे. मैदानात धोनीने घेतलेले निर्णायक निर्णय भारताला मोठ्या विजयाच्या वाटेवर घेऊन गेले.
धोनीचे योगदान –
धोनीने भारतीय क्रिकेट संघाला एका नवीन उंचीवर नेले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ICC च्या सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. धोनीने आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करत त्यांना अनेक वेळा विजेतेपद मिळवून दिले. धोनीच्या क्रिकेटमधील योगदानामुळे तो आजही लाखो क्रिकेटप्रेमींच्या हृदयात विराजमान आहे.
धोनीची यशस्वी कारकीर्द हा त्याच्या मेहनतीचा आणि कर्तृत्वाचा परिणाम आहे. धोनीने त्याच्या खेळात नेतृत्वात जी शिस्त आणि समर्पण दाखवले, त्यामुळे त्याला ‘लिजेंड’ म्हटले जाते.
निष्कर्ष –
धोनीच्या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट होते, की यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कठोर मेहनत, धैर्य आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक असते. धोनीने या सर्व गुणांचा संगम आपल्या खेळात दाखवला आहे. त्यामुळेच त्याला एक महान खेळाडू मानले जाते.