माझी शाळा निबंध ५०० शब्द
Mazi Shala Nibandh 10 Lines
माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी
क्रमांक | माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी |
---|---|
१ | माझी शाळा मला खूप आवडते आणि माझ्या शाळेचे नाव ‘सावित्रीबाई हायस्कूल’ आहे. |
२ | दोन मजल्यांची आणि सुंदर अशी फुलांची बाग असलेली प्रसिद्ध शाळा आहे. |
३ | आमच्या शाळेत विज्ञान कक्ष, संगणक कक्ष आणि ग्रंथालय सुद्धा आहे. |
४ | शाळेतील शिक्षक शिक्षणाच्या बाबतीत खूप कडक आहेत पण तेच आम्हाला अभ्यासात नेहमी मदत करतात. |
५ | दर सहा महिन्यांनी आमची सहल जाते. कधी उत्पादक कंपन्यांना भेट देते तर कधी प्राणी संग्रहालयाला. |
६ | माझ्या शाळेत छोटेसे मैदान सुद्धा आहे जिथे मी आणि माझे सवंगडी सकाळी ७ वाजता प्रार्थना करतो. |
७ | मैदानात आम्ही पीटी तासाला लंगडी, खो-खो आणि कब्बडी सारखे खेळ खेळतो. |
८ | शाळेत आम्ही सर्व सण साजरे करतो आणि सणांसाठी आम्ही विद्यार्थी शाळा सजवतो. |
९ | दरवर्षी शाळेत स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम होतात. त्यात नाटक, देशगिते आणि शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल असे कार्यक्रम करतो. |
१० | माझ्या शाळेसारखी तुम्हाला हि तुमची शाळा प्रिय असेल असे मी समजतो. |
Mazi Shala Nibandh 10 Lines pdf
माझी शाळा निबंध 20 ओळी
Mazi Shala Nibandh 20 Lines
क्रमांक | माझी शाळा निबंध 20 ओळी |
---|---|
१ | प्रत्येकाला आपल्या शाळेबद्दल कौतुक असते तसे मलाही आहे. |
२ | माझ्या शाळेचे नाव ‘स्वामी मुक्तानंद हायस्कूल’ आहे. |
३ | माझी शाळा ३ मजल्याची आणि आधुनिक सुविधा असलेली शाळा आहे. |
४ | आमच्या शाळेत १० पर्यंतचे वर्ग आहेत आणि ते दोन वेळेत भारतात. एक म्हणजे सकाळी आणि दुसरी दुपारी. |
५ | शाळेत दोन असे प्रमुख व्यक्ती आहेत एक म्हणजे माळी जे शाळेची बाग सुंदर ठेवतात आणि दुसरे म्हणजे मुलांच्या सुरक्षेतेसाठी असलेले गार्ड. |
६ | सकाळी ७.३० वाजता आम्ही शाळेच्या मैदानात ‘खरा तो एकाची धर्म’ ही कविता म्हणतो. |
७ | नंतर दुपार पर्यंत महत्वाचे तास असतात. विज्ञान आणि गणिताचे. |
८ | माझी सकाळी शाळा असल्याने १० वाजता आमचा जेवणाचा ब्रेक होतो. आम्ही सर्वे एकत्र येऊन डब्बा खातो. |
९ | नंतर एक तास पाटील सर शाळेच्या मैदानात आमची कसरत करवतात. |
१० | माझ्या शाळेत ३६ शिक्षक आहेत त्यात १० महिला शिक्षिका आहेत. |
११ | शाळेतील शिक्षक हे त्यांच्या विषयात खूप हुशार आहेत. |
१२ | शाळेचे मुख्यध्यापक शाळेची शिस्त सुनिश्चित कशी करतात येईल याची काळजी घेतात. |
१३ | प्रशस्त अशी विज्ञान प्रयोगशाळा आहे आणि आम्ही नेहमी उत्सुक असतो प्रयोगशाळेत जाण्यासाठी. |
१४ | संगणक वर्ग सुद्धा आहे तिथे आम्ही संगणकाचे सॉफ्टवेर शिकतो. |
१५ | अभ्यास करण्यासाठी आणि पुस्तक वाचनासाठी एक ग्रंथालय सुद्धा आहे. |
१६ | शाळेत दर ३ महिन्याने स्पर्धा होतात. त्यामध्ये बुद्धिमत्ता आणि मैदानी खेळ सहभागी आहेत. |
१७ | पालकसभा होते. जिथे पालकांना सुद्धा सांगितले जाते की मुलांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने कसा घ्यायचा. |
१८ | शाळेत आम्ही दिवाळी, स्वतंत्र दिन सारखे सण मोठ्या उत्साहाने साजरे करतो. |
१९ | कार्यक्रमात आम्ही सर्वे मुले सहभागी होतो. मग नाटक असो किंवा भाषण असो. |
२० | आपल्या बालपणीचे दिवस कायम मनात ठेवणारा प्रसंग म्हणजे शेळतील दिवस! |
माझी शाळा निबंध 20 ओळी pdf
माझी शाळा निबंध ५०० शब्द
Mazi Shala Nibandh 500 Words
माझ्या शाळेची ओळख आणि परिसर
माझ्या शाळेचे नाव ‘रमाबाई हायस्कूल’ आहे. आमची शाळा आमच्या गावातील खूप जुनी शाळा आहे. शाळेच्या भिंत पिवळ्या रंगाची आहे. आमच्या शाळेला छोटे से अंगण सुद्धा आहे जिथे आम्ही रोज सकाळी ७ वाजता प्रार्थना करतो. त्याच अंगणाभोवती फुलांच्या रोपांच कुपन आहे. शाळेच्या मागच्या बाजूला मोठे मैदान आहे. तिथे आम्ही पी टी तास ला मैदानी खेळ खेळतो. कधी कधी पी टी शिक्षक कांबळे सर आम्हाला मैदानाभोवती शारीरिक व्यायाम म्हणून कसरत पाळायला लावतात. माझ्या शाळेत बालवाडीपासून ते इयत्ता १० व्ही पर्यंत शिकवले जाते. आमच्या शाळेत एकूण २७ शिक्षक आहेत. सर्व शिक्षक शाळेची शिस्त कायम कशी ठेवता येईल याची काळजी करतात. तसेच ते त्यांच्या त्यांच्या विषयात पारंगत आहेत. त्यामुळे गोष्टी समजून घेण्यास फार मदत होते. विद्यार्थी सुद्धा शिक्षकांचा आदर करतात.
शिक्षक आणि शिक्षणाची गुणवत्ता
सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष राहावे म्हणून प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या मर्यादितच ठेवतात. म्हणून आमचे शिक्षक प्रत्येक विध्यार्थ्याला नावाने ओळखतात. माझ्या शाळेत खास करून विज्ञान आणि गणित सारख्या विषयांवर जास्त भर दिला जातो. कारण हे विषय आम्हा विध्यार्थ्यांसाठी थोडे अवघड असतात म्हणून शिकवताना आम्हाला व्यावहारिक जीवनातील उदाहरणे दिली जातात. माझा आवडता तास हा ‘संगणक’ आहे. आमच्या शाळेत विज्ञान प्रयोग वर्गाबरोबरच संगणकासाठी वेगळा प्रशस्त वर्ग सुद्धा आहे. संगणकाचे शिक्षक पाटील सर आम्हला संगणकाचे आपल्या जवनातील विविध कामाचे महत्व सांगतात. गुरुजी आम्हाला संगणकीय कौशल्ये शिकवतात. तसेच माझ्या शाळेत एक ग्रंथालय सुद्धा आहे. जिथे आम्ही शाळा सुटल्यानंतर अभ्यास करायला जातो. साधारण ग्रंथालयात इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान सारखी १००० पेक्षा जास्त पुस्तके असतील. ज्या मुलांना घरी अभ्यास कारायला आवडत नाही ती मुलं ग्रंथालय मध्ये नियमित अभ्यास करतात. शाळेत विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून किमान ३ ते ४ तास वाचनासाठी वेळ दिला जातो. ज्याने करून मुलांना लहान वयातच वाचनाची सवय लागावी.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुविधा आणि संगणक प्रशिक्षण
माझ्या शाळेत महिन्यातून एकदा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये चित्रकला, हस्तकला आणि मैदानी खेळ सुद्धा आहेत. तसेच वार्षिक स्पर्धे मध्ये आमच्या शाळेने मैदानी खेळांमध्ये बक्षिसे जिंकली आहेत. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वकृत्व स्पर्धा सुद्धा असते. ‘शिष्यवृत्ती’ विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी मार्गदर्शन दिले जाते. दर वर्षी स्नेह-संमेलन कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. त्यामध्ये आम्ही विद्यार्थी नाटक आणि देश गीते सादर करतो. नाटकाचा विषय हा नैतिकता आणि समाजसेवा हाच असतो. आमच्या शाळेत सरकारी शिबीर सुद्धा आयोजित करतात. शिबिरामध्ये मोफत चष्मे वाटप, लसीकरण, आरोग्य तपासणी सारखे कार्यक्रम आयोजित करतात. शाळेत आम्हाला स्वच्छेतेचे महत्त्व शिकवले जाते.
माझी शाळा निबंध 2 पेज
सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रम
माझ्या शाळेत सर्वे सण साजरे केले जातात. सणांसाठी शाळेतील वर्गांची सजावट करणे ही जवाबदारी विद्यार्थ्यांवर असते. स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने आम्ही साजरे करतो. देशभक्तीवर भाषण आणि कविता लिहून आम्ही रंगमंचावर सादर करतो. शाळेत आम्हाला पर्यावरणावर सुद्धा महत्वाचे धडे दिले जातात. ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’ अशी मिरवणूक आम्ही वृक्षारोपण सोहळ्याला काढतो. ‘विज्ञान महोत्सव’ सारखे सण सुद्धा असतात. ज्यामध्ये आम्ही नवीन नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करतो. ज्याचे प्रयत्न चांगले तसे त्याला बक्षीस दिले जाते.
सहली आणि इतर शाळेतील उपक्रम
दर सहा महिन्यातून आमची सहल आयोजित केली जाते. सहिलीत आम्ही उत्पादन कंपन्यांना भेट देऊन आमचे विज्ञान वैषयिक ज्ञान वाढवतो. कधी कधी सहली मध्ये जर आपण कुठे एकाद्या ठिकाणी फसलो किंवा अडकलो असलो किंवा कठीण परिस्थितीमध्ये कसे आपण स्वतःचे रक्षण करू शकतो ते शिकवतात. बाकीच्या क्रियाकलापामध्ये शास्त्रीय संगीत, योग अभ्यास सुद्धा आहे. ते आम्हाला बुधवारी आणि शुक्रवारी शिकवले जाते. आम्ही नियमित अभ्यास कसा करावा आणि नियमित अभ्यास केल्याने आपल्याला परीक्षेच्या वेळी गोंधळ होऊ नये या साठी प्रयत्न करतात. म्हणून शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी जे आज मोठ्या हुद्यावर आहेत त्यांचे विचार आम्हाला सांगतात. शाळेतल्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी मार्दर्शन दिले जाते. जिल्ह्यातली ‘बेस्ट शाळा’ म्हणून पारितोषिक आम्हाला मिळालेले आहे.
Majhi shala nibandh pdf
शाळा कोणता अभ्यासक्रम अनुसरण करते?
आमची शाळा [राज्य बोर्ड/CBSE/ICSE/IB] अभ्यासक्रमाचे अनुसरण करते, जो शैक्षणिक उत्कृष्टता आणि एकूण विकासावर लक्ष केंद्रित करतो.
कोणत्या सह-पाठ्यक्रमिक क्रियाकलापांचा समावेश आहे?
आम्ही विविध सह-पाठ्यक्रमिक क्रियाकलाप ऑफर करतो, जसे की खेळ (फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट), कला (चित्रकला, संगीत, नाटक), आणि क्लब (शास्त्र, साहित्य).
शाळेत विद्यार्थ्यांना कोणती आरोग्य सेवा उपलब्ध आहे?
शाळेत आरोग्य सेवा म्हणून एक शाळा नर्स उपलब्ध आहे, जो विद्यार्थ्यांचे प्राथमिक उपचार करतो आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करतो.