Marathi News

Me Pahilela Apghat Essay In Marathi | ‘मी पाहिलेला अपघात’ मराठी निबंध

‘मी पाहिलेला अपघात’ मराठी निबंध

मी पाहिलेला अपघात चित्र

Me Pahilela Apghat Essay In Marathi In 10 Lines

‘मी पाहिलेला अपघात’ मराठी निबंध १० ओळी

क्रमांक‘मी पाहिलेला अपघात’ मराठी निबंध
1गेल्या वर्षी मी एक ट्रक चा मोठा अपघात पहिला.
2तो मी पाहिलेला सर्वात भयंकर अपघात होता. मी आयुष्यभर विसरणार नाही.
3तो संपूर्ण ट्रक अगी मध्ये जळत होता.
4आम्ही सर्वे एसी टी मधून गावी जाण्यासाठी निघालो होतो.
5साधारण मोठ्या रस्त्याला लागल्यावर आमच्या गप्पा चालूच होत्या तेव्हा घाट आरंभ व्ह्याच्या आधीच आम्ही खिडकिच्या बाहेर पहिला.
6तर एका मोठ्या १६ चाकी ट्रक ला भीषण आग लागली होती.
7सर्व अत्यावश्यक सेवा तिथे चालू होत्या जसं कि ऍम्ब्युलन्स, अग्निशमन दल आणि ट्रॅफिक पोलीस.
8यशस्वी रित्या पोलिसानी चालकाला सुखरूप काढला.
9थोड्या वेळाने तिकडे जोर चा स्पोर्ट झाला आणि अगदी बॉम्ब फोडल्या सारखा आवाज आला.
10मागे पहिला तर ट्रक ची इंधन टाकी फुटल्यामुळे झाला होता. हा माझ्या आयुष्यातील घाबरावणारा अपघात मी पहिला होता.

Me pahilela apghat essay in marathi 200 words

‘मी पाहिलेला अपघात’ मराठी निबंध २०० ओळी

काही दिवसांपूर्वी मी गणपतीला गावी जात असताना मी एक भयानक अपघात पहिला, जो मी कधीही विसरू शकत नाही. आम्ही गावी जाण्यासाठी एस टी बसमध्ये प्रवास करत होतो. अचानक, खिडकीतून आम्ही एका १६ चाकी ट्रकला मोठ्या आगीमध्ये जळताना पाहिले. त्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, आणि वाहतूक पोलीस तत्काळ पोहोचले होते. पोलिसांनी चालकाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यशस्वी झाले. आजू बाजूचा जागा पोलिसानी आणि इतर कर्मचाऱ्यांनी सुरक्षित केला. अग्निशमन दल आग वीजवण्याचा प्रयत्न करत होते. आजूबाजूचे लोक सुद्धा गाडीतून उतरून लांबून सर्व पाहत होते. मोबाइल मध्ये शूट करत होते. चालकाने सांगितलं कि ब्रेक लायनर घासून घासून त्यामध्ये आग पकडली होती.

पोलीस अधिकाऱ्यांनी जमा झालेली गर्दी एका बाजूला केली. अग्निशमन दल आग वीजवण्याचा प्रयत्न करत होते. पण थोड्याच वेळात एक मोठा आवाज आला, जणू काही बॉम्ब फुटल्याचा होता. हे ट्रकच्या इंधन टाकी फुटल्यामुळे झाला होता. कारण इंधन टाकी मध्ये शिल्लक डिझेल तसेच होते. या अपघाताने मला खूपच धक्का बसला आणि मी हे दृश्य आयुष्यभर विसरणार नाही. हे अपघाताचे वर्णन केल्यामुळे, मुलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्व पटवून देता येईल. तसेच, अशा भयंकर घटनांपासून सावध राहण्याची गरज आहे हे शिकता येईल. ट्रॅफिक नियमांचे पालन केल्यास आपण स्वतःच आपले आणि इतरांचे रक्षण करू शकतो.

Me pahilela apghat essay in marathi 200 words pdf download

Mi pahilela apghat in marathi nibandh in 300 Words

‘मी पाहिलेला अपघात’ मराठी निबंध ३०० ओळी

आम्ही रविवारच्या सुट्टी ला कुटुंबासह फिरायला गेलो होतो. घाटावर जरा ट्राफिक झाले होते. आमच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या तेव्हाच अग्निशमन, पोलिस आणि रुग्णवाहिका यांनी आमचे लक्ष वेधले. आमच्यासह इतर गाड्या थोड्या पुढे जाऊन थांबल्या होत्या. आम्ही गाडीतून बाहेर उतरलो आणि गर्दीच्या दिशेने पाहून आम्ही सर्वे थक्क झालो होतो. कारण एका कुटुंबाची कार मोठ्या मालगाडीच्या ट्रक ला धडकली होती. अर्धी कार त्या ट्रकच्या मालगाडी खाली अडकली होती. कार चालक आणि अजून एक व्यक्ती गंभीर जखमी होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन चे प्रयत्न चालूच होते. आजूबाजूचे लोक ही घाबरले होते. पोलिसानी सर्वांच्या सुरक्षते साठी गर्दी बाजूला एका बाजूला केली.

कार ची थेट धडक ही ट्रकच्या इंधन टाकी ला झाल्याने, टाकी फुटून इंधन कार वर आणि जमिनीवर पसरत होते. त्यांना लवकरात लवकर बाहेरकाढण्याचा प्रयत्न करत होते कारण आग पकडू शकते. मागच्या सीट वरती असलेल्या बाकींच्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना जास्त गंभीर जखमा झाल्या नव्हत्या. पण चालक आणि अजून एक सदस्य तिकडेच अडकून होते. कटर च्या मदतीने कारचा दरवाजा कापून त्या दोघांनाहि बाहेर काढले. दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते. रुग्णवाहिका तिथेच असल्याने तत्काळ त्यांना जवळच्या इस्पितळ मध्ये नेह्ण्यात आले. तेवढ्यातच जोराचा आवाज झाला. इतर आजूबाजूचे लोक घाबरून इकडे तिकडे पाळायला लागले. कारण कार चे इंजिन चालू होते आणि ट्रक चे त्यावर इंधन पडून आग पकडली होती. अग्निशमन च्या अजून २ गाड्या आल्या आणि आग विझविण्याचा प्रत्यन चालू केला.

आम्ही सर्वे प्रार्थना करत होतो कि कोणाचाही जीव नको जायला. पोलिस सुद्धा लोकांना दिलासा देत होते की घाबरू नका परिस्थिती नियंत्रनात आहे. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. हे सर्वे १ तास चाले असेल. तेव्हा कळले कि पोलीस आणि अग्निशमन यांचे काम किती धोकादायक असते. माझ्या डोक्यातून हा प्रसंग २ दिवस तरी घर करून होता. मला हि कार ने घरी जाताना भीती वाटत होती. पण आपण सुद्धा गाडी ने प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Mi pahilela apghat in marathi nibandh in 300 Words PDF

रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आणि त्यांचे उपाय

आजकाल, रस्ते अपघात खरंच एक गंभीर समस्या बनली आहे. विविध सरकारी आकडेवारीनुसार, अपघातांची विशिष्ट कारणे समोर आली आहेत. आता आपण पाहुयात वारंवार होणाऱ्या अपघातांची प्रमुख करणे आणि त्यांचे उपाय काय आहेत.

  1. ओव्हर स्पीडिंग (अतिवेग) –

अतिवेगामुळे अपघाताची शक्यता कायम वाढते. अत्यधिक वेगामुळे अपघाताची तीव्रता वाढते आणि दुखापतीचे धोके मोठे होतात. वाहन चालवताना वेगाच्या मर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने गरज नसताना ओव्हरटेक करू नये. सुरक्षित वेगाने गाडी चालवावी. उच्च वेगामुळे अपघात होण्याची शक्यता खूप जास्त असते.

  1. मद्यपान करून वाहन चालवणे –

मद्यपानामुळे ड्रायव्हिंग करताना गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते. अल्कोहोल मुले लक्ष एकाग्र करून गाडी चालवणे कठीण होते आणि प्रतिक्रिया वेळ वाढवते. त्यामुळे, वाहन चालवताना मद्यपान करणे टाळावे. अल्कोहोलमुळे दृष्टी सुद्धा बाधित होते आणि अपघात होण्याचे प्रमाण वाढते.

  1. विचलित ड्रायव्हर –

विचलित होणे हे एक मोठे कारण आहे जे अपघाताला निमंत्रण देतो. मोबाईलवर बोलणे किंवा इतर विचलनामुळे वाहन चालवण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडतो. फोनवर बोलणे हे प्रमुख विचलनाचे उदाहरण आहे, जे वाहन चालवण्याच्या कौशल्यावर नकारात्मक प्रभाव टाकते.

  1. रेड लाइट जंपिंग –

लाल दिव्याची पर्वा न करता रास्ता पार करणे एक सामान्य झाले आहे. हे फक्त चालकाच्या जीवाला धोका नाही तर इतर रस्ता ओलांडत असलेल्या इतरांच्या सुरक्षिततेसाठीही धोकादायक असते. लाल दिव्याचे पालन केले तर वेळ जास्त लागेल पण अपघात टाळता येऊ शकतात.

  1. सुरक्षा उपकरनाचा वापर न करणे –

सुरक्षा उपकरणे, जसे की सीट बेल्ट आणि हेल्मेट, अपघाताच्या गंभीरतेला कमी करतात. हे उपकरणे न वापरणे अपघातांच्या गंभीरतेत वाढ करू शकते. चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट आणि दुचाकीवर हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्यक आहे.

अपघात टाळण्यासाठी उपाय

  1. सुरक्षित दृष्टीकोन विकसित करा: वाहन चालवताना नेहमी सावधगिरीने आणि सुरक्षित दृष्टीकोन ठेवून चालवा.
  2. सेफ्टी बेल्ट घाला: वाहनात असताना नेहमी सीट बेल्ट वापरा.
  3. प्रवाशांना मर्यादित ठेवा: वाहनातील प्रवाशांची संख्या नियंत्रणात ठेवा.
  4. मध्यम वेगाने गाडी चालवा: अत्यधिक वेग टाळा आणि मर्यादित वेगाने गाडी चालवा.

ही साधी आणि प्रभावी पद्धत अपघातांची संख्या कमी करण्यास मदत करेल आणि रस्त्यावर सुरक्षितता वाढवेल.

या उपायांची अंमलबजावणी करून, आपण रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा योगदान देऊ शकता आणि अपघातांची शक्यता कमी करू शकता.

अपघात का होतात?

अपघात वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात, जसे की वाहन चालवताना नियमांचे पालन न करणे, रस्त्यावर गाडीचा वेग वाढवणे, रस्त्यांची खराब स्थिती किंवा अचानक परिस्थिती नियंत्रणात नसणे.

अपघात झाल्यास त्वरित काय करावे?

अपघात झाल्यास सर्वप्रथम शांत राहा आणि पोलिस किंवा आपत्कालीन सेवा (जसे की 108 किंवा 112) यांना फोन करा. जखमींना शक्य तितकी मदत करा आणि वैद्यकीय मदतीसाठी नजीकच्या रुग्णालयात घेऊन जा.

अपघातात मदत करताना काय काळजी घ्यावी?

मदत करताना आपली सुरक्षितता लक्षात घ्या. अपघाताच्या ठिकाणी ट्रॅफिक नियमन करा, शक्य असल्यास जखमींना हलवू नका, कारण हे त्यांच्या दुखापतीसाठी घातक ठरू शकते.

वाहन अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा, सीट बेल्ट बांधा, हेल्मेट घाला, वेगावर नियंत्रण ठेवा, आणि वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे टाळा.

अपघाताच्या नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?

पोलिस तक्रार दाखल करताना वाहनाच्या कागदपत्रांची, विमा कागदपत्रांची, चालकाच्या परवान्याची आणि अपघाताची पूर्ण माहिती आवश्यक असते.

अपघात झाल्यावर विमा दावा कसा करावा?

अपघात झाल्यानंतर त्वरित विमा कंपनीला कळवा, घटनास्थळाचे फोटो घ्या, पोलिस रिपोर्ट मिळवा, आणि विमा कागदपत्रांसह दावा प्रक्रिया पूर्ण करा.

अपघातानंतर कायदे काय सांगतात?

अपघात झाल्यास तत्काळ तक्रार दाखल करणे, जखमींना मदत करणे, आणि दोषी आढळल्यास त्यास दंड, वाहन परवाना रद्द, किंवा शिक्षा होऊ शकते.

अपघातात इतरांना मदत केल्यास कायदेशीर अडचण येऊ शकते का?

नाही, “गुड समॅरिटन कायदा”नुसार, इतरांना मदत करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होत नाही. मदत करणाऱ्याला पोलिसांनी त्रास दिला जाऊ नये म्हणून हा कायदा आहे.

बचावासाठी अपघातानंतरचे पहिल्या मदतीचे ज्ञान कसे मिळवावे?

पहिल्या मदतीचे प्रशिक्षण स्थानिक आरोग्य केंद्र, एनजीओ किंवा ऑनलाइन कोर्सेसद्वारे मिळवता येते, ज्यामुळे अपघाताच्या वेळी योग्य प्रकारे मदत करता येते.

Exit mobile version