Marathi News

My Grandmother Essay In Marathi | ‘माझी आजी’ निबंध

‘माझी आजी’ निबंध

My grandmother essay in marathi 10 lines

माझी आजी निबंध मराठी 10 ओळी

क्र.माझी आजी निबंध मराठी 10 ओळी
1.माझी आजी, वयाच्या ७० व्या वर्षी, आमच्या कुटुंबातील सर्वात मोठी आणि काळजी घेणारी सदस्य आहे.
2.ती आपल्या सर्वांची खूप काळजी घेते आणि कुटुंबात चांगले वातावरण राहील हे सुनिश्चित करते.
3.दहा सदस्यांसह संयुक्त कुटुंबातून आलेली, ती माझ्या वडिलांसह आणि त्यांच्या भावांसह, त्यांच्याशी ती मुलांसारखी वागते अशा सर्वांची काळजी घेण्यात असीम संयम दाखवते.
4.जरी ती शाळेत शिक्षिका नसली तरी ती मला गणित आणि विज्ञान शिकवत असे. तिने मला शिकवलेली सूत्रे हि मला आजही आठवते.
5.आजीच्या आठवणी आजही ताज्या आहेत आणि ती रोज रात्री माझ्या चुलत भावांसोबत तुझ्या लहानपणीच्या गमतीशीर गोष्ट सांगते.
6.या कथांमध्ये नेहमीच सखोल नैतिकता असते जी आम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन करतात.
7.आजी आम्हाला अशा गोष्टी सांगत ज्याच्यात चिकाटी, मेहनत आणि धीर असे. जेव्हा मी अभ्यासासाठी निराश होतो तेव्हा मला कसे प्रेरित करावे हे तिला माहित असे.
8.माझ्या यशाचे श्रेय मी तिला देतो कारण माझे आई-वडील नोकरी करत असताना ती मला शाळेच्या अभ्यासात मदत करत असे.
9.तिची शिकवण आजपर्यंत माझ्यासोबत आहे आणि तिने मला लहानपणी शिकवलेली सूत्रे मला स्पष्टपणे आठवतात.
10.वागणूक आणि शिष्टाचाराच्या बाबतीत माझे पालनपोषणही आजी नेच केले; तिने मला एक उत्कृष्ट उदाहरण घालून मोठ्यांचा आदर करण्याचे मूल्य शिकवले.

My Grandmother Essay In Marathi 100 Words

माझी आजी निबंध मराठी १०० ओळी

माझी आजी ही ७५ वर्षांची आहे आणि ती नेहमी आनंदात असते. ती आमच्या कुटुंबातील महत्वाची सदस्य आहे. सकाळी लवकर उठून ती आम्हाला शाळेसाठी तयार करते आणि जेवणाचा डब्बा बनवते. आमच्या शाळेत गेल्यावर ती घरातील साफसफाई, जेवण बनवणे, आणि इतर कामे करते. आम्ही शाळेतून परतल्यावर ती आमच्यासोबत खेळते आणि बागेत फिरायला घेऊन जाते. रात्रीच्या जेवणानंतर ती आमचा अभ्यास घेते. आजीचे जेवण खूप स्वादिष्ट असते, विशेषतः पुरणपोळी. तिच्या हसमुख स्वभावामुळे आजूबाजूचे लोकही तिला ओळखतात. ती नेहमी इतरांसाठी मदतीचा हाथ पुढे करते. आम्हाला तिच्या गोष्टी ऐकायला आवडतात. आम्ही खूप नशीबवान आहोत की आमच्याकडे अशी प्रेमळ आणि समजदार आजी आहे. तीने आम्हाला शिस्त, प्रेम, आणि एकत्र राहण्याचे महत्त्व शिकवले आहे.

My Grandmother Essay In Marathi 150 Words

माझी आजी निबंध मराठी १५० ओळी

माझी आजी ही नेहमी आनंदी राहते. ती आमच्या कुटुंबाची एक महत्त्वाची सदस्य आहे आणि घरातील सर्वजण तिचा मान राखतात. आजी सकाळी आम्हाला लवकर उठवते, शाळेसाठी तयार करते, आणि जेवणाचा डब्बा बनवते. आम्ही शाळेतून परतल्यावर ती आमच्या सोबत खेळते आणि बागेत फिरायला घेऊन जाते. संध्याकाळी ती पुन्हा स्वयंपाकात व्यस्त होते आणि आमच्या गृहपाठात मदत सुद्धा करते.

आजीचा स्वभाव खूप हसरा आणि प्रेमळ आहे. ती नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर असते. घरातील सर्व कामे ती चपळपणे करते आणि आमच्या सोबत वेळ घालवते. तिच्या हसतमुख स्वभावामुळे आजूबाजूचे लोकही तिला ओळखतात. तिच्या हातची पुरणपोळी तर सर्वांची आवडती आहे.

शाळेत काही कार्यक्रम असतील, जसे संमेलन किंवा पालक-सभा, यात आजी नेहमी सहभागी होते. शाळेच्या सहलीसाठी आम्हाला परवानगी मिळवून देते. रविवारच्या सुट्टीला आम्ही आजी सोबत सकाळी चालायला जातो. घरातील मोठे निर्णय आजही तिच्या सल्ल्याने घेतले जातात. ती आम्हाला शिस्त, प्रेम, आणि एकत्र राहण्याचे महत्त्व शिकवते. तिच्या सहवासात आम्ही खूप काही शिकतो.

सारांश, आजी असणे हे खूप भाग्यवान असते. तिच्या अनुभवांमुळे आम्ही अनेक गोष्टी शिकतो. त्यामुळे तिचा नेहमी आदर करावा आणि तिचे महत्त्व ओळखावे.

My grandmother essay in marathi 150 words pdf

My grandmother essay in marathi 200 words

माझी आजी निबंध मराठी २०० ओळी

माझी प्रिय आजी

प्रत्येकाला आपली आजी प्रिय असते तसेच मला माझी आजी खूप आवडते. ती आमच्या कुटुंबातील महत्वाची सदस्य आहे. आमची आजी आम्हाला लवकर उठवते आणि आम्हाला शाळेसाठी तयार करते. ती आमचा डब्बा बनवते आणि शाळेत सोडते. नंतर ती घरातील कामे करते, जसे की साफसफाई आणि स्वयंपाक. आमचे हे घर जुने आहे, पण तिने नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवले आहे.

आजीचे प्रेम आणि काळजी

दोन्ही आजी आमच्यावर खूप प्रेम करतात. शाळेतून परतल्यावर आजी आमच्यासोबत वेळ घालवते. ती आम्हाला संध्याकाळी बागेत खेळायला घेऊन जाते. ती रात्रीचे स्वयंपाक करते आणि आमचा अभ्यास घेते. तिचा आमच्यावर खूप जीव आहे.आमच्या आजूबाजूचे लोक तिचा हसमुख स्वभावामुळे तिला ओळखतात. ती नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तयार असते. जास्त वय असूनही ती तितकीच चपळ आहे आणि कधीही आळशीपणा करत नाही. आजी खूप छान जेवण बनवते, विशेषत: पुरणपोळी. आम्ही तिच्या हातचे जेवण खूप आवडीने खातो.

आजीचा सहभाग

शाळेच्या कार्यक्रमांमध्ये आजी नेहमी हजर असते. ती आमच्या शिक्षणाची चौकशी करते. सहलीसाठी बाबांनी जरी नकार दिला तरी आजी आम्हाला परवानगी मिळवून देत असे. आम्ही आनंदाने सहलीला जात असायचो. रविवारी आम्ही तिच्यासोबत चालायला जातो. घरातील निर्णयांमध्ये आजीचे मत महत्वाचे असते. ती आमच्या समस्या सोडवते आणि रात्री आम्हाला गोष्टी सांगते. तिच्या गोष्टींमध्ये शिकवण असते.

आजीची शिकवण

आजी प्रेमळ आहे आणि कडक शिस्तीची आहे. तिने आम्हाला लवकर उठणे, निरोगी राहणे, सर्वांचा आदर करणे शिकवले. आजी सर्वांना समानतेने वागवते. ती वार्षिक सण छान साजरे करते आणि आम्हाला शिकवते. खरंच, आजीचे असणे खूप भाग्यवान आहे. तिने आम्हाला शिस्त, प्रेम आणि एकत्र राहण्याचे महत्व शिकवले आहे. तिचा आदर करावा आणि तिच्या अनुभवांमधून शिकावे.

My grandmother essay in marathi 200 words pdf

My Grandmother Essay In Marathi In 300 Words

माझी आजी निबंध मराठी ३०० ओळी

माझी आजी ७५ वर्षांची आहे. नेहमी आनंदात आणि हसतमुख राहते. आमच्या कुटुंबात तिचा खूप मान आहे. ती आम्हा सगळ्यांना सकाळी लवकर उठवते, शाळेसाठी तयार करते आणि आमचे डबे बनवून ठेवते. आम्हाला शाळेत सोडल्यावर ती घरातील साफसफाई, जेवण आणि इतर कामे करते.

आम्ही शाळेतून घरी आल्यावर आजी आमच्यासोबत वेळ घालवते, आम्हाला बागेत घेऊन जाते. आमचा अभ्यास घेते आणि गृहपाठात मदत सुद्धा करते. तिचा हसमुख स्वभावामुळे सर्वांनाच ती खूप आवडते आणि ती नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असते. तिच्या वयानुसार ती खूप चपळ आहे. घरकाम, चालणे, किंवा आमच्यासोबत वेळ घालवणे यात ती कधीच आळशीपणा करत नाही.

आजीच्या हातचे जेवण खूप स्वादिष्ट असते, विशेषतः तिची पुरणपोळी. शाळेच्या कार्यक्रमांना आजी नेहमी हजर असते आणि शिक्षकांशी आमच्या अभ्यासाबद्दल बोलते. जर सहलीला जायचे असेल तर आम्ही आजीला सांगतो आणि ती बाबांकडून परवानगी मिळवून देते. आजी आम्हाला नेहमी पाठीशी उभी असते आणि आम्ही खूप नशीबवान आहोत की आमच्याकडे अशी प्रेमळ आणि समजदार आजी आहे.

दर रविवारी आम्ही आजी सोबत बागेत चालायला जातो. घरातील मोठे निर्णय बाबा आणि काकां आजीशी बोलूनच घेतात. घरातील समस्या आम्हा मुलांना कधीच जाणवू दिल्या नाही. रोज रात्री झोपायच्या आधी आजी आम्हाला छान-छान गोष्टी सांगते ज्यातून शिकायला मिळते. तिच्या जुन्या आठवणी आम्हाला खूप आवडतात.

आजी प्रेमळ असली तरी कडक शिस्तीची आहे. सकाळी लवकर उठणे, निरोगी राहणे, सर्वांचा आदर करणे या गोष्टी तिने आम्हाला शिकवल्या. नियमित अभ्यास करणे आणि जेवल्यानंतर ताट उचलून ठेवणे यासारख्या लहान लहान गोष्टी तिने शिकवल्या. ती सर्वांना समानतेने वागवते आणि सर्वे सण साजरे करायला शिकवते. ती फोन वापरत नाही, पण सगळ्यांचे नंबर तिला पाठ आहेत.

सारांश, आजी असणे हे खूप नशीबवान असते. म्हणून आपण आपल्या आजी-आजोबांचा आदर करावा, त्यांचे महत्त्व ओळखावे आणि त्यांच्या अनुभवातून शिकावे. त्यांनी दिलेले प्रेम, शिस्त आणि एकत्र राहण्याचे धडे आपण कायम लक्षात ठेवावेत.

My Grandmother Essay In Marathi In 500 Words

माझी आजी निबंध मराठी 10 वी

आजीचे वय आणि आनंदी स्वभाव

माझी आजी ही ७५ वर्षाची आहे. ती कायम आनंदात आणि हसत खेळत राहते. माझी आजी ही कुटुंब प्रमुख आणि महत्वाची सदस्य आहे. घरात आजीचा खूप आदर करतात. आम्हा सर्वाना आजी सकाळी लवकर उठवते आणि शाळेसाठी तयार करते. आमच्या दुपारच्या जेवणाचा डब्बा सुद्धा बनवून ठेवते. आम्हाला शाळेत सोडल्यानंतर ती घरातली इतर कामे करण्यात व्यस्त होते. जस की साफ सफाई, जेवण आणि इतर कामे ती करते. आमचे घर फार जुने आहे परंतु तिने ते आजही नव्या सारखे राखले आहे.

कुटुंबात आजीची महत्त्वाची भूमिका

बाबांची आई असो किंवा आई ची आई, दोनीही आजीही आम्हा मुलांवर तितकच प्रेम आणि लाड करतात. आम्ही शाळेतून घरी आल्यावर आजी आमच्या सोबत वेळ घालवते. आम्हाला संध्याकाळी बागेत चालायला किंवा खेळायला घेऊन जाते. घरी आल्यावर ती संध्याकाळी पुन्हा रात्रीच्या स्वयंपाका ला लागते. थोडा वेळ काढून आमचा अभ्यास घेते, गृहपाठात पण मदत करते. लहापणापासूनच आम्ही तिच्या सहवासात राहिल्यामुळे तिचा आमच्या मुलांवर खूप जीव आहे.

आजीचा हसमुख स्वभाव आणि मदतीचा हात

तिझ्या हसमुख स्वभावामुळे तिला आजूबाजूचे लोक सुद्धा ओळखतात. घरातच नव्हे, बाहेर सुद्धा कोणी जर अडचणीत असेल तर ती नेहमी मदतीचा हाथ पुढे करते. ती एवढे वय असूनही चपळ आहे. घर काम असो, चालायला जाणे किंवा आमच्या सोबत वेळ घालवणे असो यात ती कधीच आळशीपणा करत नाही. नेहमी उत्साही राहून काम करते. माझी आजी खूप छान जेवण बनवते. त्यातल्या त्यात ती पुरणपोळी खूप चवीष्ट बनवते. आम्हा सर्वाना आजीच्या हातचे जेवण फार आवडते. कोणी उपाशी तर राहत नाही ना याची काळजी घेते. बाबा संध्याकाळी कामावरून उशिरा ये पर्यंत आजी जागी असते.

शाळेतील कार्यक्रमांमध्ये आजीची उपस्थिती

शाळेत जर काही कार्यक्रम असेल जसं संमेलन किंवा पालक-सभा यात आजी नेहमी हजर असते. शाळेतल्या शिक्षकांशी आमच्या अभ्य्साबद्दल नियमित चौकशी करते. जर आमची शाळेची सहल जाणार असेल आणि बाबांचा नकार असेल तेव्हा आम्ही भावंडं आजी ला मनवात असू आणि नेहमी प्रमाणे आम्हाला सहली साठी आजीमुळे परवानगी मिळत असे. आम्ही आनंदाने सहलीला जात असायचो. आमच्या पाठीशी आजी नेहमी उभी असते. आम्ही सर्व नशीबवान आहोत कि आम्हाला अशी प्रेमळ, समजुदार आणि शीस्तबद्ध आजी भेटली आहे.

रविवारी आजीसोबत घालवणे

रविवारच्या सुट्टीला आम्ही सकाळी लवकर उठून आजी सोबत बाहेर चालायला जातो. घरातील मोठे निर्णय बाबा आणि काका आजही आजीला विचारून घेतात. मग ते पारिवारिक असो किंवा आर्थिक असो. घरातील समस्या आम्हा मुलांपर्यंत येऊ नये याची काळजी घेते. रोज रात्री आम्ही भावंडं झोपायन्या आधी आजी आम्हाला छान छान गोष्टी सांगत. तिच्या गोष्टीत नेहमी शिकवण असे. कधी कधी ती तिच्या लहानपणीच्या आठवणी आमहाला सांगायची.

आजीची कडक शिस्त आणि शिकवण

आजी जितकी प्रेमळ आहे तितकीच ती कडक शिस्तीची पण आहे. सकाळी लवकर उठणे, निरोगी राहणे, सर्वांचा आदर करणे, एकत्र राहणे या सारख्या गोष्टी आम्हाला आजीनेच शिकवल्या. नियमित अभ्यास करणे आणि जेवल्यानंतर आपापले ताठ उचलून किचन वर ठेवणे या सारख्या छोट्या छोट्या गोष्टी तिने आम्हाला शिकवल्या. आजी समानतेने सर्वाना वागवते. आजी जुन्या विचारांची असल्यामुळे ती सर्वे सण खूप छान साजरे करते आणि आम्हाला तसं शिकवते. ती फोन नाही वापरत पण सर्वांचे नंबर तिझ्या तोंड पाठ आहेत.

सारांश

खरंच आजी असणे हे खूप भाग्यवान असते. या निबंधाचा तात्पर्य आहे की, आपल्या आजी-आजोबांचा आदर करावा आणि त्यांचं महत्व ओळखावं. ते आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ असतात आणि त्यांच्या अनुभवांमुळे आपण खूप काही शिकत असतो. आजीने आपल्याला शिस्त, प्रेम, आणि एकत्र राहण्याचे महत्त्व शिकवले आहे. त्यांच्या सहवासात राहून आपण कसे वागावे, एकमेकांची कशी काळजी घ्यावी हे शिकतो. त्यामुळे त्यांचा नेहमी आदर द्यावा आणि त्यांचं सान्निध्य हे आनंदाने आपण सर्वानी अनुभवावं.

My Grandmother Essay In Marathi In 500 Words

FAQ

What is Grandmother in Marathi?

Ans – Grandmother Means आजी

आजीचा आपल्या जीवनात काय महत्त्व असते?

आजी आपल्याला कथा सांगते, संस्कार देते आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे काम करते. तिचे अनुभव आपल्याला जीवनात मार्गदर्शन करतात.

आजी कशा प्रकारे आपली काळजी घेते?

आजी आपल्याला चांगले खायला घालते, आपल्या तब्येतीची काळजी घेते, तसेच आपल्याला आशीर्वाद देते.

आजी आपल्याला काय शिकवते?

आजी आपल्याला प्रेम, आदर, सहनशीलता आणि आपले कर्तव्य कसे पार पाडायचे याची शिकवण देते. तिचे अनुभव आपल्याला महत्त्वाचे जीवनधडे देतात.

आजीला कोणते पदार्थ बनवायला आवडते?

आजीला पारंपरिक पदार्थ बनवायला आवडते जसे की पोळी-भाजी, पुरणपोळी, बटाटे वडे इ. तिच्या हातची चव सर्वांना आवडते.

Mazi Aaji Essay In Marathi | ‘माझी आजी’ निबंध मराठी

My Grandfather Essay In Marathi | ‘माझे आजोबा’ निबंध

Exit mobile version