Marathi News

Pradushan Ek Samasya Essay In Marathi | प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

‘प्रदूषण एक समस्या’ निबंध मराठी

Pradushan Ek Samasya Essay In Marathi

Pradushan ek samasya essay in marathi 10 lines

प्रदूषण एक समस्या निबंध मराठी १० ओळी

क्रमांक‘प्रदूषण’ मराठी निबंध १० ओळी
१.प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे ज्यावर विचार केले पाहिजे.
२.शहरी भागात आणि कारखान्यांमध्ये जास्त प्रदूषण होते.
३.जल, वायू, ध्वनी आणि पर्यावरण यांच्या विविध प्रकारे प्रदूषणाचे आहेत.
४.सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा पर्यावरणावर आणि मानवी आणि प्राणी जीवनावर नकारात्मक आणि विनाशकारी परिणाम होतात.
५.मानवी क्रियाकलापांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचवतात.
६.प्रदूषणामुळे पृथ्वीला नुकसान होते आणि त्याचे होणारे परिणाम ओळखून हे नुकसान रोखणे आवश्यक आहे.
७.ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल हे वायू प्रदूषणाचे दोन थेट परिणाम आहेत, जसे की पृथ्वीच्या तापमानात वाढ, हिमनदी वितळणे आणि जंगलातील आगांच्या वाढीसाठी जबाबदार आहेत.
८.प्रदूषणाच्या या समस्येविरुद्ध जगभरातील सरकार आणि संस्थांनी एकत्र येऊन लढायचे आहे.
९.दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे, ज्यामुळे आपला जीवनाचा स्तर कमी होत आहे.
१०.प्रदूषणाची ही मोठी समस्या सरकार आणि व्यक्तींच्या एकत्रित प्रयत्नांनीच सोडवता येऊ शकते.

Pradushan ek samasya essay in marathi 100 words

प्रदूषण एक समस्या निबंध मराठी १०० ओळी

प्रदूषण ही एक घंभीर समस्या आहे. प्रदूषणामुळे वेग वेगळ्या रूपाने पृथ्वीची झीज होते. त्यामुळे पृथ्वीवर मानवी आणि इतर सजीवांचे जीवन धोक्यात येत आहे. आपल्या घरातून रोज येणार कचरा, दूषित पाणी आणि आपण ज्या वस्तू नेहमी वापरतो त्याचे उत्पादन करताना सुद्धा प्रदूषण खूप होते. जसे वायू , जल, हवा आणि जमिनेचे प्रदूषण. अगदी छोट्या स्तरावर का होईना आपण त्याबद्दल महत्वाची पाऊले आताच उचलायला हवी. जसे कि ओला कचरा आणि सुख कचरा याचे विभाजन करणे. प्लास्टिक न वापरता कापडाच्या पिशव्या वापरणे. पेट्रोल, डिझेल सारख्या वाहनाचा कमी वापर करून इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देणे. विद्युत निर्मिती साठी धारण बांध आणि सौर ऊर्जेचा वापर करणे.

Pradushan ek samasya essay in marathi 100 words pdf

Pradushan ek samasya essay in marathi 200 words

प्रदूषण एक समस्या निबंध मराठी २०० ओळी

वाढत्या प्रदूषण मुळे होणाऱ्या हवामानात बदल आणि पृथ्वीवरचे सजीवांचे जीवन लवकर धोक्यात येईल. याचे मुख्य कारण आहे हवा, पाणी, जमीन, ध्वनी प्रदूषणासह विविध प्रदूषण आपल्याला माहित आहेत. दरवर्षी वाढणारे औद्योगिक उपक्रम, शहरीकरण आणि अयोग्य कचरा व्यवस्थापन यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.

वायू प्रदूषण होण्यामागे जास्त विषारी वायू आहेत ते म्हणजे कार्बन मोनो-ऑक्साइड, नायट्रोजन डाय-ऑक्साइड आणि सल्फर डाय-ऑक्साइड. हे इतके विषारी आहेत की त्यामुळे आपल्याला श्वसनाचे आजार होतात. दमा, खोकला यांसारखे रोग होतात. गटाराचे दूषित पाणी, कंपन्यांमधून निघणारे सांडपाणी आणि अन्य कचरा नद्यांत किंवा समुद्रात टाकणे. यामुळे पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांना भरपूर हानी होते. जसे कि आपण जे मासे खातो ते सुद्धा याच पाण्यात असतात. तेच मासे आपण खाल्ले तर आपल्यला हि धोका निर्माण हातो. जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला तर शेत जमिनीवर आणि पिंकावर नकारात्मक परिणाम होतो. जमिनीची सुपीकता कालांतराने कमी होते. हल्लीच्या दिवसात शहरीकरणामुळे बांधकामाचे प्रमाण खूप वाढत आहे. नवीन पूल, मेट्रो आणि कंपनी बांधकाम यामध्ये वापरणारे यंत्र, जाड मशीन यामुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. ज्यांना आधीच ह्रदयाचा त्रास आहे त्यांना जास्त ध्वनी मुळे त्रास होऊ शकतो.

आता आपण पाहूया कि प्रदूषण कमी प्रमाणावर होईल यावर आपण काय काय पावले उचलू शकतो ते पाहूया. यासाठी सामाजिक आणि सरकारी पातळीवर काम करणे गरजेचे आहे. सर्वानी एकत्र येऊन प्रदूषण थांबवण्यासाठी कार्य केले तर आपण आपल्या पृथ्वीवरील जीवन वाचवू शकतो. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक यंत्रांचा वापर करणे. वीज निर्मिती साठी सौर ऊर्जेचा वापर करणे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे. ओला कचरा सुख कचरा याचे विभाजन करणे ज्याने करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट करून जमीन आणि पाणी सुरक्षित करू. प्रदूषण कसे थांबवावे यासाठी उपक्रम चालवणे. लगेच प्रदूषण कमी होणे शक्य नाही पण प्रदूषणाला हळू हळू आळा बसवू शकतो.

Pradushan ek samasya essay in marathi 200 words pdf

Pradushan Ek Samasya Essay In Marathi In 500 Words

प्रदूषण एक समस्या निबंध मराठी ५०० ओळी

प्रदूषण एक समस्या तर आहे पण त्याहून अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे त्यावर केलेले उपाय. प्रदूषणाचा पृथ्वीवर पण आणि मानवी तसेच इतर जीवांवर त्याचा घातक परिणाम होतो. प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यात मुख्य वायू , जल आणि जमीन असे महत्वाचे प्रकार आहेत. चला तर एक एक करून प्रदूषण चे प्रकार पाहू.

१. वायू प्रदूषण:
जास्त करून उत्पादन कंपन्यांमध्ये वायू प्रदूषण होते. नंतर त्याच कंपनीतून निर्माण झालेले घटक असे सांड पाणी समुद्रात सोडले जाते. तसेच गाड्यांमधून निघणारा कार्बन सुद्धा वायू प्रदूषण चे मुख्य कारण आहे. जिथे घरगुती गॅस वापरला जात नाही तिथे आजून सुद्धा लाकडाचा वापर इंधन म्हणून होते. त्यामुळे ही कार्बनच्या धूर मुळे वायू प्रदूषण होते. कार्बन चा हवेत प्रमाण वाढल्याने घेतला जाणारा श्वासा मुळे फुप्फुसाचा रोग, ह्रदय विकार सुद्धा होऊ शकतो.

२. जल प्रदूषण:
सांड पाणी आदी नद्यांमध्ये जाते आणि मग पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांवर त्याचा परिणाम होतो. काही खेडेगाव अजून सुद्धा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांनाही त्याचा त्रास होतो. दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळ तर कोलोरा, हिपॅटिटिस, ताप आणि असे असंख्य रोग होऊ शकतात.

३. जमिनीचे प्रदूषण:
कचरा, विषारी रसायने आणि जाड धातू यांमुळे जमिनीचा ऱ्हास होतो. शेती करताना सुद्धा वापरली जाणारी कीटक नाशके आणि रासायनिक खाते यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. त्यामुळे पिंकांचा दर्जा कमी होतो. तेच पीक आपण अन्न म्हणून खाले तर अपचन, पोट दुखी सारखे आजार होणे.

४. ध्वनी प्रदूषण:
बांधकाम, इंजिन्स, गाडीचा हॉर्न आणि लाऊडस्पेकर यामध्ये जास्त ध्वनी प्रदूषण होते. कानाचे पडदे कमजोर होणे, हृदयाचे ठोके वाढणे, घाबरणे आणि तणाव येणे असा परिणाम मानवी शरीरावर होते.

पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम:
जर हवेत मिथेन आणि कार्बन डायऑकसाईड चे प्रमाण वाढले तर पृथ्वीच्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल घडून येतो जसे कि पृथ्वीव्हे तापमान वाढणे, बर्फाळ प्रदेशात बर्फ वितळुन समुद्राची पातळी वाढणे. समुद्र पातळी वाढली कि सुनामी सारखी आपत्ती येते. मानवी जोवनावर तसेच प्राण्यांवर सुद्धा त्याचा खूप वैर परिणाम होतो.

प्रदूषण कमी करण्याचे उपाय:
आपण जर नैसर्गिक स्रोतांचा जास्त वापर केला तर प्रदूषण कमी होईल. सौर, पवन चक्की आणि धरण बांध यारख्या ऊर्जेचा वापर केला तर प्रदूषण कमी होईल. पृथ्वीचे नैसर्गिक वातावरण सुरक्षित राखू शकतो. सायकल किंवा इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर करणे. इलेकट्रीक वाहनांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होत नाही. कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे. वस्तूंचा पुनर्वापर करणे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करणे. प्लास्टिकचा वापर कमी करणे. कारण प्लास्टिक हा असा पदार्थ आहे ज्याचे निसर्गात विघटन होत नाही.

सेंद्रिय शेतीत प्राधान्य देणे जेणेकरून जमिनीची सुपीकता कायम राहील आणि त्या पिकांचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होणार नाही. गांडूळ खत सारखे प्रकल्प वापरणे. प्रदूषण थांबवण्या विषयी जण जागृती निर्माण करणे. शाळा, विद्यालय किंवा सामाजिक प्रकल्पामध्ये प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगणे. पण हे महत्वाचे आहे कि सर्वांना एकत्र येऊन प्रदूषण टाळण्याची पावले उचलली पाहिजेत.

पर्यावरण प्रदूषण pdf marathi

Reference Link

Pradushan Ek Samasya Essay In Marathi

FAQ – प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

प्रदूषण म्हणजे काय?

प्रदूषण म्हणजे वातावरणात विषारी घटकांचे वाढलेले प्रमाण, ज्यामुळे पृथ्वीवरील मानवी तसेच इतर जीवांवर त्यांचा घातक परिणाम होतो.

प्रदूषणाचे महत्वाचे प्रकार कोणते आहेत?

प्रदूषणाचे प्रमुख प्रकार वायू प्रदूषण, जल प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण, आणि ध्वनी प्रदूषण आहेत.

वायू प्रदूषण कसे होते?

वायू प्रदूषण उत्पादन कंपन्यांमधील धुरामुळे, गाड्यांमधून निघणाऱ्या कार्बनमुळे, आणि घरगुती इंधन म्हणून लाकडाचा वापर केल्यामुळे होते.

जल प्रदूषणाचे मुख्य कारण काय आहे?

सांड पाणी नद्यांमध्ये सोडल्यामुळे जल प्रदूषण होते. यामुळे जलचर प्राणी आणि नदीवर अवलंबून असणाऱ्या गावांवर त्याचा परिणाम होतो.

जमिनीचे प्रदूषण कसे होते?

कचरा, विषारी रसायने, जड धातू, कीटक नाशके, आणि रासायनिक खते यांच्या वापरामुळे जमिनीचे प्रदूषण होते.

ध्वनी प्रदूषणाचे मुख्य स्रोत कोणते आहेत?

बांधकाम, इंजिन्स, गाडीचा हॉर्न, आणि लाऊडस्पीकर यांमुळे ध्वनी प्रदूषण होते.

प्रदूषणाचा पृथ्वीवर काय परिणाम होतो?

प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान वाढते, बर्फ वितळतो, समुद्राची पातळी वाढते, आणि सुनामी सारख्या आपत्ती होऊ शकतात.

प्रदूषण कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत?

सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सायकलचा वापर, इलेक्ट्रिक वाहने, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, पुनर्वापर, सेंद्रिय शेती, आणि जनजागृती हे प्रदूषण कमी करण्याचे उपाय आहेत.

वायू प्रदूषणामुळे कोणते आरोग्याचे धोके आहेत?

वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा रोग, हृदय विकार, आणि इतर श्वसनाचे आजार होऊ शकतात.

जल प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात?

जल प्रदूषणामुळे दूषित पाण्यामुळे कोलोरा, हिपॅटिटिस, ताप आणि इतर अनेक आजार होऊ शकतात.

Exit mobile version