‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ निबंध मराठी
Table of Contents
Save water essay in marathi in 10 lines
‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ निबंध मराठी १० ओळी
क्र. | ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ निबंध मराठी |
---|---|
1. | पृथ्वीचा तसेच मानवी शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. |
2. | सर्व प्रमुख उद्योगांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाण्याची आवश्यकता असते. |
3. | मात्र, ही मौल्यवान अशी संपत्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. |
4. | काही भागात तर अजिबात पाणी नाही. त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो पाण्यासाठी. |
5. | त्यामुळे जलसंधारणाची गरज आता पूर्वीपेक्षा जास्त आहे. |
6. | उपलब्ध पाण्यापैकी फक्त तीन टक्के गोड पाणी आहे. |
7. | दररोज, आपण विविध कारणांसाठी पाण्याचा उपयोग करत असतो. |
8. | उद्योगधंदे आणि सांडपाणी सोडण्यात येणारे सांडपाणी थेट आपल्या जलकुंभांमध्ये मिसळले जाते. |
9. | त्याशिवाय, आम्ही जंगले तोडत राहतो जी पाण्याचे संरक्षण करण्याचा एक उत्तम स्रोत आहे. |
10. | त्यामुळे पाणीटंचाई ही खरी गोष्ट आहे. |
Save Water Essay In Marathi 250 Words
पाणी वाचवा निबंध २५० शब्द
शरीर आणि पंच महाभूत
आपले शरीर हे पंच महाभूतांपासून बनलेले आहे. हवे नंतर सर्वात महत्वाची गोष्टी जी शरीराला नेहमी लागते ती म्हणजे पाणी. पाण्यावर फक्त मनुष्य अवलंबून नाही तर प्राणी, झाडे, शेती अशा बऱ्याच गोष्टी आहेत.
पाण्याचे महत्व
आपली पृथ्वी हि ७५ टक्के पाण्याने भरली आहे. पण आपण ते पाणी पिऊ शकत नाही. जगात फक्त २ ते ३ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. म्हणून पाण्याचा जपून वापर करणे अतिशय महत्वाचे आहे.
पृथ्वीवरील पाण्याचे वितरण
दिवसभरात आपण पाण्याचा भरपूर वापर करतो. अंघोळ, धुणे, पिणे आणि स्वयंपाकामध्ये पाण्याचा वापर करतो. पाण्याशिवाय आपले जगणे खूप कठीण होऊन जाईल. कारण आपण जे अन्न खातो ते सुद्धा शेतीतून येते आणि त्यासाठी पाणी लागते.
दुष्काळ आणि पाणी व्यवस्थापन
भारतीय शेती ही पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे. देशातील काही भागात १२ महिने दुष्काळ असतो. जरी पाऊसाचे पाणी आले तरी ते साठवता आले पाहिजे.
महाराष्ट्रात खूप आधी जागोजागी तळे बांधण्यात आले आहेत. त्याच तळ्यांमुळे दुष्काळी भागात शेती केली जाते. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ढग बनतात आणि नंतर पाऊस होतो. तेच पावसाचे पाणी पिण्यायोग्य असते.
धरणे आणि तळ्यांचे महत्व
धरण किंवा तळे बांधल्याने ज्यांना पाणी नाही त्यांना पाणी उपलब्ध करू शकतो. लाखो टन पाणी वाया जात आहे रोज. हे पाणी मुबलक आहे, परंतु वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे कधी खूप कमी पाऊस किंवा कधी जास्त पाऊस पडतो. आपण सर्वजण पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहोत.
पाणी वाचवण्याचे उपाय
आपण आज पाणी वाचवण्याचे शिकलो तर उद्या आपल्या पुढल्या पिढीला पाणी जपून वापरण्याची सवय लागेल. यावर्षी बऱ्याच ठिकाणी मे महिन्यात शहरी भागात सुद्धा पाणी कमी होते. कारण पाणी वाया घालवणे आणि रोज नवीन नवीन पिण्याच्या पाण्याच्या कंपन्या उभ्या राहणे. याच कंपन्यांमुळे पाण्याची कमतरता सामान्य माणसाला भोगावी लागते.
Save Water Essay In Marathi 250 Words PDF
FAQ
पाणी कसे वाचवावे?
उत्तर- पाणी वाचवण्यासाठी मोठी पावले उचलण्याची गरज नाही तर रोज जिथे जिथे पाणी वाया जाते तिथे प्रतिबंध घालणे. जस नळ बंद करणे भरून झाल्यावर अशा गोष्टी.
पाणी वाचवण्याची आवश्यकता का आहे?
पाण्याचा स्रोत मर्यादित आहे आणि त्याचा अतिरेकी वापर भविष्यातील पाणीटंचाईला कारणीभूत ठरू शकतो. वाढती लोकसंख्या, जलप्रदूषण आणि हवामानातील बदल यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होत आहे.
घरगुती वापरात पाणी कसे वाचवू शकतो?
अंघोळीला शॉवरऐवजी बादलीचा वापर करा.
दात घासताना आणि भांडी धुताना नळ बंद ठेवा.
गळती असलेल्या नळांची त्वरित दुरुस्ती करा.
पाण्याचे शुद्धिकरण कसे करावे?
पाण्यातील घाण, विषाणू आणि बॅक्टेरियांची संख्या कमी करण्यासाठी पाणी गाळणे, उकळणे किंवा जलशुद्धीकरण यंत्राचा वापर करावा.
पावसाच्या पाण्याचे संकलन म्हणजे काय, आणि ते कसे फायदेशीर आहे?
पावसाचे पाणी घराच्या छतावरून संकलित करून जमिनीत साठवले जाते, ज्यामुळे भूजलस्तर वाढविण्यात मदत होते. यामुळे टंचाईच्या काळातही पाणी उपलब्ध होऊ शकते.
शेतीमध्ये पाणी कसे वाचवावे?
ठिबक सिंचन व तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करून पाणी कमी प्रमाणात वापरता येते, आणि त्याद्वारे पाणी वाचवता येते.
शहरातील पाणीटंचाई कशी टाळता येईल?
प्रत्येक नागरिकाने पाणी काटकसरीने वापरावे.
पाण्याचे पुनर्वापर (रिसायकलिंग) करणे.
सार्वजनिक ठिकाणच्या नळांच्या गळतीची देखरेख करणे.
पाणी वाचवण्यासाठी शाळांमध्ये कोणते उपक्रम राबवता येतात?
शालेय मुलांसाठी पाणी वाचवण्याचे महत्त्व सांगणारे शिबिरे आयोजित करणे.
शाळेत पाणी गळती रोखण्यासाठी नळांची देखरेख करणे.
पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा याचे शिक्षण देणे.